Tuesday, May 14, 2024

Contemporaries

 सहज कुतूहल म्हणून एका कालखंडात पण जगात वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती पाहत होतो. काही विस्मयकारक उदाहरणे दिसली. नमुन्यादाखल काही:

Pythagoras आणि  गौतम बुद्ध हे समकालीन होते.

तसेच अमेरिकेचा George Washington,  युरोपचा Mozart  आणि  आपले नाना फडणवीस समकालीन!

 चकित करणारी गोष्ट म्हणजे Sir Isaac Newton  हा  छत्रपती शिवाजी महाराज,  छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या तिघांनाही समकालीन  होता.

अजून थोडं मागे गेलं तर भारतात अकबर  तर तिकडे विल्यम शेक्सपिअर 

आणि

युरोपात Galileo आणि इथे संत तुकाराम महाराज!

इकडे बाबर  आक्रमण करत होता  तेव्हा इंग्लंडमध्ये King Henry VIII ने एका मागून एक लग्न करायचा सपाटा लावला होता.

 आपण बऱ्याच वेळा इतिहास हा विषयसापेक्ष वाचतो - म्हणजे राजकीय इतिहास, औद्योगिक इतिहास, विज्ञानाचा इतिहास, वगैरे. पण या सर्वांतील अनेक महत्त्वाच्या घटना बऱ्याचदा एकाच कालखंडात घडत असतात हे आपल्या लक्षात येत नाही.

No comments: